My Soul Has A Hat - ब्राझीलियन लेखक आणि कवी Mario de Andrade यांची लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता
My Soul Has A Hat ही ब्राझीलियन लेखक आणि कवी Mario de Andrade यांची एक लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता आहे My Soul Has A Hat by Mario de Andrade मी माझे वय मोजले आणि जाणवले की मी जेवढे जगलो आहे, त्यापेक्षा आता जगण्यासाठीचा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मला लहान मुलासारखे वाटते, ज्याने कँडीचा पुडा बक्षीस म्हणून मिळवला होता - सुरुवातीला तो आनंदाने गोड कँड्या खात होता, पण जेव्हा त्याला समजले की पुढ्यात कँड्या फारशा शिल्लक राहिल्या नाहीत, तेव्हा तो राहिलेल्या कँड्याचा जास्त आनंद घेऊ लागला. माझ्याकडे आता अशा अगणित बैठकांसाठी वेळ नाही, ज्यामध्ये नियम, प्रक्रिया आणि अंतर्गत धोरणांवर चर्चा केली जाते, पण शेवटी त्यामधील काहीच होत नाही. माझ्यात आता अशा मूर्ख लोकांना सहन करण्याची सहनशीलता नाहीये, जे वयाने मोठे झाले असले तरी त्यांची समज वाढली नाही. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे - मला आता फक्त सत्व पाहिजे; माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. माझ्या कँडींच्या पुड्यात आता फारशा कँड्या उरलेल्या नाहीत. मला अशा लोकांसोबत राहायचे आहे, जे वास्तववादी आहेत, जे आपल्या चुका हसत स्वीकारतात, आ...