My Soul Has A Hat - ब्राझीलियन लेखक आणि कवी Mario de Andrade यांची लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता

My Soul Has A Hat ही ब्राझीलियन लेखक आणि कवी Mario de Andrade यांची एक लोकप्रिय आणि प्रेरणादायी कविता आहे


My Soul Has A Hat by Mario de Andrade

मी माझे वय मोजले आणि जाणवले की मी जेवढे जगलो आहे, त्यापेक्षा आता जगण्यासाठीचा कमी वेळ शिल्लक राहिला आहे. मला लहान मुलासारखे वाटते, ज्याने कँडीचा पुडा बक्षीस म्हणून मिळवला होता - सुरुवातीला तो आनंदाने गोड कँड्या खात होता, पण जेव्हा त्याला समजले की पुढ्यात कँड्या फारशा शिल्लक राहिल्या नाहीत, तेव्हा तो राहिलेल्या कँड्याचा जास्त आनंद घेऊ लागला.

माझ्याकडे आता अशा अगणित बैठकांसाठी वेळ नाही, ज्यामध्ये नियम, प्रक्रिया आणि अंतर्गत धोरणांवर चर्चा केली जाते, पण शेवटी त्यामधील काहीच होत नाही.

माझ्यात आता अशा मूर्ख लोकांना सहन करण्याची सहनशीलता नाहीये, जे वयाने मोठे झाले असले तरी त्यांची समज वाढली नाही. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे - मला आता फक्त सत्व पाहिजे; माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. माझ्या कँडींच्या पुड्यात आता फारशा कँड्या उरलेल्या नाहीत.

मला अशा लोकांसोबत राहायचे आहे, जे वास्तववादी आहेत, जे आपल्या चुका हसत स्वीकारतात, आपल्या यशाने हुरळून जात नाहीत आणि आपल्या कृतींची जबाबदारी घेतात. यामुळेच माणसाची प्रतिष्ठा टिकून राहते आणि आपण सत्य व प्रामाणिकपणे जगतो. आयुष्य प्रभावी बनवणाऱ्या या मूलभूत गोष्टी आहेत.

मला अशा लोकांच्या सहवासात राहायचे आहे ज्यांना जीवनाच्या कठीण आघातांमधून धडा शिकून पुढे गेलेल्या  लोकांच्या हृदयाला आपल्या आत्म्याचा गोड स्पर्श कसा करायचा हे माहित आहे. 

होय, माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाहीये, मला पूर्ण उमेदीने जगायचे आहे, जे फक्त परिपक्वतेमधूनच होईल. आता उरलेल्या कँडीमधील कोणतीही कँडी वाया घालवायची नाही. कारण मला खात्री आहे की आतापर्यंत खाल्लेल्यांपेक्षा राहिलेल्या अधिक मधुर असतील.

माझे ध्येय हे आहे की आयुष्याच्या शेवटापर्यंत मी माझ्या प्रियजनांसोबत तसेच माझ्या अंतकरणात समाधानी आणि शांत असावे. आपल्याला दोन आयुष्य मिळतात—आणि दुसरे आयुष्य तेव्हा सुरू होते, जेव्हा आपल्याला समजते की आपल्याकडे फक्त एकच आहे.

********************


मित्रहो , कार्ल युंग म्हणतो, 

"खरे आयुष्य चाळिशीनंतरच सुरू होते. त्याआधी तुम्ही फक्त संशोधन करत असता." 

त्यामुळे ४०  वर्षापर्यंत तुम्ही तुमचे  जीवन समजून घेतले असेल. त्यामध्ये तुम्हाला काही बरे वाईट अनुभव आले असतील. त्यामधून शिकून किंवा ते विसरून जगायला आले पाहिजे . तुमच्या असेही लक्षात आले असेल की आता खिशात जास्त कँडी शिल्लक नाही आहेत तर तुम्ही आता दिलखुलास जगले पाहिजे , एक नवी सुरवात केली पाहिजे. मला वाटते कवितेची शेवटची ओळ महत्वाची आहे आणि त्रिकालाबाधित आहे ती म्हणजे माणसाला फक्त एकच आयुष्य मिळाले आहे त्यामुळे ते आपल्याला मनमोळेपणाने, भरभरून आणू पूर्ण उत्सहासाने जगता आले पाहिजे .  

आणि 

"आता उरलेल्या कँडीमधील कोणतीही कँडी वाया घालवायची नाही"













 

Comments

  1. How perfectly articulated! Everyone should pray for this realisation. Amen!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Indian Writing in English B A II Sem IV (Notes)

Dream on Monkey Mountain by Derek Walcott (B. A. III Sem. VI.)

Silence! The Court is in Session (Study Material)